S
H
A
S
H
V
A
T
Whats-app.png

कापूस लागवड तंत्रज्ञान

कापूस लागवड तंत्रज्ञान

cotton_logo.jpeg
कापूस लागवड
कपाशी हे विदर्भातील एकमेव नगदी पीक असून या पिकाखाली सुमारे १५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. परंतु सरासरी उत्पादकता ३०० किलो रुई / हेक्टर ही भारताच्या सरासरी पेक्षा (५३७ किलो रुई / हेक्टर) तुलनात्मकरित्या कमी आहे. अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. कापूस उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत.
हवामान
हे पीक साधारणपणे ६० ते ७५ सें.मी. पावसाच्या प्रदेशात चांगले येते. बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी कमीत कमी १५ अंश से. तापमानाची आवश्यकता असते. या पिकाची साधारणपणे २१ ते २७ अंश से. तापमानात अपेक्षित वाढ होते आणि २७ ते ३३ अंश से. तापमानात फुलपाती आणि फलधारणा चांगली होते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड अशा हवामानात बोंडे चांगली भरतात व उमलतात.
जमीन
fields-7287267_640.png या पिकास मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. (जमिनीचा सामू ६ ते ८.५ पर्यंत).
पूर्वमशागत व भरखते
कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरिता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी (जांभूळवाही) दिली असता, तणांची तिव्रता २० टक्केपर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत (निदान तीन वर्षातून एकवेळ) पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत (५ टन प्रति हेक्टर) दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून ५ सें.मी. बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे.
बियाणे व बीज प्रक्रिया
fields-7287267_640.png पेरणीकरिता दर्जेदार, बीज प्रक्रिया केलेले व शिफारस केलेल्या वाणांचे शक्यतोवर तंतूविरहित बियाण्याचा वापर करावा. बीज प्रक्रिया केलेली नसल्यास पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास कारबोक्झीन (व्हिटॅव्हॅक्स) एक ग्रॅम किंवा थायरम तीन ग्रॅम याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. बियाण्यावर इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमिथाक्झम @ 7.5 ग्रॅम / किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया केल्यास किडींपासून बचाव होतो. अॅझाटोबॅक्टर (२५ ग्रॅम/किलो बियाणे) आणि नायट्रोजन स्थिरीकरण व फॉस्फेट विरघळणारे जीवाणू (२० ग्रॅम/किलो बियाणे) या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी. संकरित जातींचे एफ २ (दुसऱ्या पिढीतील) बियाण्याचा पेरणीकरिता वापर करू नये. कारण या पिढीतील बियाण्यापासून उत्पादन कमी येते. सुधारित जातींची आनुवंशिक शुध्दता राखल्यास तीन वर्ष पर्यंत स्वतःचे घरचे बियाणे पेरणीकरिता वापरता येते. मधल्या दोन तीन वेचण्यापासूनचे मिळणारे कापसाचे बियाणे अधिक चांगले असते.
पेरणीची वेळ

बागायती (मान्सूनपूर्व)

  1. २० ते ३० मे किंवा तापमान ४०० सें.ग्रे. च्या खाली गेल्यावर पेरणी करावी.
  2. १. पेरणी आधी चांगले ओलीत करूनच पेरणी करावी.
  3. २. पेरतांना लवकर येणारे वाण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसात सापडणार नाही याची काळजी घ्यावी.
  4. ३. पाण्याचा निचरा होण्यासाठी रूंद वरंबा सरी पध्दत किंवा ठराविक अंतरावर सऱ्या पाडाव्या.

धूळपेरणी

सरळ वाणांची मध्यम जमिनीत मान्सूनचा पाऊस येण्याचा अंदाज पाहून ७-८ दिवस अगोदर, जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पेरणी करावी.

मान्सून (कोरडवाहू) पेरणी

१५ ते ३० जून किंवा मान्सूनचा सुमारे ७५ते १०० मि.मी. (पेरणीयोग्य) पाऊस झाल्यावर ताबडतोब पेरणी करावी.

आंतरपीक
मध्यम ते भारी जमिनीमध्ये अधिक आर्थिक मिळकतीकरीता शिफारशीनुसार प्रभावी आंतरपिक पध्दतीमध्ये कापूस + मुग (१:१) किंवा कापूस पध्दतीचा अवलंब करावा तसेच कपाशी उडीद (१:१) किंवा लवकर येणाऱ्या सोयाबीन जाती (१:१) या आंतरपीक ज्वारी तूर ज्वारी (६:१:२:१ ओळी) या आंतरपिक पध्दतीचा अवलंब करावा तसेच कपाशीच्या ८ ते १० ओळीनंतर तूर पिकाचे आंतरपीक घ्यावे.
वाणांची निवड
सद्यस्थितीत बाजारात अनेक बीटी कपाशीचे संकरीत वाण उपलब्ध आहेत. यापैकी कोणता वाण निवडावा याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होत आहे. बीटी कपाशीचा वाण निवडतांना कोरडवाहू लागवडीचा प्रकार, वाणांचे गुणधर्म याचा विचार करावा.
  • आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा.
  • रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशिल / प्रतिकारक्षम संकरीत वाण असावा.
  • रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा वाण निवडण्यात यावा.
  • पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा.
  • बोंडांचा आकार कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा.
  • शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेर पर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणाऱ्या बोंडांचा सुध्दा आकार मोठा राहतो व बोंड फुटण्याचे प्रमाण वाढते.
  • बोंडे चांगली फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा. ज्यामुळे कपाशीला बाजारभाव चांगला मिळू शकतो.
अ. क्र. जात पेरणीची पध्दत लागवड अंतर मध्यम भारी जमिनीकरिता ओळी झाडांत (सें.मी.) हेक्टरी झाडसंख्या (हजारमध्ये) बियाण्याचे हेक्टरी प्रमाण (किलो)
१. कपाशी: बागायती
संकरित जाती
सरी वरंबा, कुशा पध्दत किंवा ठिबक सिंचन १२० x ९० ९.३ २ ते २.५
संकरीत बीटी कपाशी वाण
१. पीकेव्ही हाय-२ बीजी-II
टोकून ९० x ४५ २४.७ २ ते २.५
२. पिडीकेव्ही-जेकेएल-११६ बीजी-II टोकून ९० x ४५ २४.७ २ ते २.५
कपाशी: कोरडवाहू
अ) देशी सुधारित जाती एकेए५, एकेए७, एकेए ८ एकेए ८४०१ सरत्याने
सरत्याने/टोकून
६० x १५
६० x ३०
१११.१
५५.६
१२ ते १५
९ ते १०
ब) अमेरिकन सुधारित जाती. सुवर्ण शुभ्रा (एकेएच-०९-५) पीकेव्ही रजत, एकेएच ८८२८ एकेएच ०८१, टोकून
टोकून
सरत्याने
सरत्याने
६० x ३०
६० x ३०
६० x ३०
६० x १५
५५.६
५५.६
५५.६
१११.१
८ ते १०
१० ते १२
१० ते १२
१५ ते २०
क) देशी संकरित जाती पीकेव्ही डीएच १ पीकेव्ही सुवर्णा टोकून
टोकून
६० x ४५
६० x ४५
३७
३७
३ ते ३.५
३ ते ३.५
ड) अमे. संकरित जाती पीकेव्ही हाय-२ पीकेव्ही हाय-४ पीकेव्ही हाय-५ टोकून
टोकून
टोकून
९० x ६०
९० x ६०
९० x ६०
१८.५
१८.५
२७.८
३.५ ते ४
३.५ ते ४
४.५ ते ५

पेरणीच्या जाती/पद्धती/अंतर/बियाणे दर व हेक्टरी रोप लोकसंख्या

picture2.png
खत व्यवस्थापन
जात हेक्टरी प्रमाण (किलो)
पेरणीचे वेळेस उगवणीनंतर
नत्र : स्फुरद : पालाश ३० दिवसांनी ६० दिवसांनी
कपाशी : बागायती बीटी कपाशी ४० : ६० : ६० ४० ४०
संकरीत कापूस ३५ : ५० : ५० ३५ ३०
कपाशी : कोरडवाहू बीटी कपाशी ३० : ३० : ३० ३० -
देशी सुधारित जाती २० : २० : २० २० -
अमेरिकन सुधारित जाती ३० : ३० : ३० ३० -
देशी संकरित जाती ३० : ३० : ३० ३० -
अमेरिकन संकरित जाती ३० : ३० : ३० ३० -
रासायनिक खतमात्रा माती परिक्षणानुसार देणे अधिक योग्य. वरील तक्त्याप्रमाणे नत्र, स्फुरद आणि पालाश पिकास देतांना किती रासायनिक खते द्यावीत हे आपण कोणती खते वापरतो यावर अवलंबून असते. निवडक रासायनिक खताचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.
शिफारसीत रासायनिक खत मात्रा (किलो)
नत्र : स्फुरद : पालाश रासायनिक खताची नावे आणि प्रमाण प्रति हेक्टरी (ढोबळमानाने)
४० : ६० : ६० १) डीएपी १३० किलो + युरिया ४० किलो+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० किलो किंवा
२) १५ : १५ : १५-२७० किलो सुपरफॉस्फेट १२० कि.+ म्युरेट ऑफ पोटॅश ३० किलो किंवा
३) २० : २० : ०-२०० किलो सुपरफॉस्फेट १२० कि. ४ म्युरेट ऑफ पोटॅश १०० किलो किंवा
४) युरिया ९० किलो + सुपरफॉस्फेट ३७५ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश १०० किलो.
५) १०:२६:२६ - २३१ किलो + ३७ किलो युरिया.
४५ : ४५ : ४५ १) डीएपी ९८ किलो युरिया ६० किलो म्युरेट ऑफ पोटॅश ७५ किलो किंवा
२) १५ : १५ : १५- ३०० किलो किंवा
३) २० : २० : ० २२५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ७५ किलो किंवा
४) युरिया ९८ किलो + सुपरफॉस्फेट २८० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ७५ किलो.
५) १० : २६ : २६ - १७५ किलो ६० किलो युरिया.
३० : ३० : ३० १ ) डीएपी ६५ किलो + युरिया ४० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो किंवा
२) १५ : १५ : १५- २०० किलो किंवा
३) २० : २० : ० १५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो किंवा
४) युरिया ६५ किलो + सुपरफॉस्फेट १९० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो.
५) १०:२६:२६ - १५१ किलो + ४० किलो युरिया.
२० : २० : २० १) डीएपी ४५ किलो युरिया २५ किलो किंवा
२) २० : २० : ० १०० किलो किंवा
३) युरिया ४५ किलो + सुपरफॉस्फेट १३० किलो +म्युरेट ऑफ पोटॅश ३५ किलो
४) १० : २६ : २६ - ७५ किलो + २५ किलो युरिया
४५ किलो नत्र १०० किलो युरिया
४० किलो नत्र ९० किलो युरिया
३० किलो नत्र ६५ किलो युरिया
२० किलो नत्र ४५ किलो युरिया
पीक फुलावर असताना २ टक्के युरियाची आणि बोंडे भरण्याचे अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी केल्यास कापूस उत्पादनात १३.६ टक्क्याने वाढ झाल्याचे प्रायोगिक निष्कर्ष आहेत.
प्रमाण :
२ टक्के युरिया = २०० ग्रॅम युरिया + १० लिटर पाणी (साध्या पंपाने),
२ टक्के डीएपी = २०० ग्रॅम डीएपी + १० लिटर पाणी या प्रमाणात.
खाडे भरणे / विरळणी
उगवणीनंतर ३ ते ५ दिवसात खाडे/नांगे भरावेत आणि १५ ते २० दिवसात विरळणी करून शेतात अपेक्षित झाड संख्या राखावी.
तण व्यवस्थापन
कपाशीचे पहिले ९ आठवडे तण विरहीत ठेवणे जास्त आवश्यक आहे. त्याकरीता बियाणे उगवणीनंतर १० ते २० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा डवरणी करावी व आवश्यकतेनुसार २-३ वेळा निंदणी करावी.
उगवणपूर्व तणनाशकांचा वापर सुरूवातीच्या काळात शेत तण विरहीत ठेवण्यासाठी व कपाशीच्या चांगल्या उगवणीसाठी उगवणपूर्व तण नाशकांचा वापर करावा यामध्ये तण नियंत्रणासाठी पेंडीमेथालीन ३८.७ टक्के या उगवणपूर्व तणनाशकाची १.५-१.७५ किलो/हेक्टरी व्यापारी घटकाची (२०-२५ मि.ली. प्रति १० लिटर पाणी) किंवा डायुरॉन ८० टक्के डब्ल्यु.पी. या तणनाशकाची १.०-२.०० किलो/हेक्टरी व्यापारी घटकाची (२०-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) या प्रमाणात पेरणी नंतर जमिनीवर फवारणी करावी.
उगवण पश्चात तणनाशकांचा वापर गरज भासल्यास शिफारस केलेल्या उगवण पश्चात तणनाशकांचा योग्य वेळी व योग्ण प्रमाणातच वापर करावा. उगवण पश्चात तणनाशकामध्ये उभ्या पिकात पीक ३०-४० दिवसांचे असतांना पायरीथीओबक सोडियम १० टक्के ई.सी. (हिटविड) या तणनाशकाची ०.६२५-०.७५० किलो/हेक्टरी व्यापारी घटकाची (१२.५-१५ मि.ली. प्रति १० लिटर पाणी) किंवा तृणवर्गीय तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास क्विझालोफोप ईथाइल ५ टक्के ई.सी. (टरगा सुपर) या तणनाशकाची १.० लिटर किलो/हेक्टरी व्यापारी घटकाची (२० मि.ली. प्रति १० लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. तणनाशकाची फवारणी करतांना शिफारशीत तणनाशकांचाच वापर करावा व तणनाशक फवारणीसाठी शक्यतोवर वेगळा पंप वापरावा. तणनाशकाचा वापर करतांना वापरण्यात येणारे नोझल हेक्टरी द्रावण, तणनाशकाची मात्रा ई. बाबतीत दक्षता बाळगावी.
ओलीत व्यवस्थापन
कोरडवाहू (संरक्षक ओलीत) कपाशीचे पीक फुलावर व बोंडे भरण्याचे अवस्थेत असतांना पाण्याचा ताण पडल्यास व पाणी देण्याची सोय असल्यास १०-१२ दिवसांचे अंतराने २-३ संरक्षक ओलीत (एकसरी आड) द्यावे.
बागायती बागायती पिकास आवश्यकतेनुसार ओलीत करावे. बोंडे फुटणे सुरू झाल्यानंतर ओलीत करु नये.
कपाशीमध्ये ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन
ठिबकद्वारे खतमात्रा पेरणी नंतर दिवसांनी
१० % नत्र आणि पालाश ची शिफारसीत मात्र पेरणीच्या वेळेस
२० % नत्र आणि पालाश ची शिफारसीत मात्र २० दिवसांनी
२५ % नत्र आणि पालाश ची शिफारसीत मात्र ४० दिवसांनी
२५ % नत्र आणि पालाश ची शिफारसीत मात्र ६० दिवसांनी
२० % नत्र आणि पालाश ची शिफारसीत मात्र ८० दिवसांनी
कपाशीवरील किडी व त्यांचे व्यवस्थापन
कीटक लक्षणे नियंत्रण/उपाय
रसशोषण करणाऱ्या किडी
१) तुडतुडे • तुडतुडे फिक्कट हिरव्या रंगाचे, पाचरीच्या आकाराचे असून ते नेहमी लांबीला तिरके चालतात.
• तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून पानातील रस शोषण करतात.
• त्यामुळे पाने प्रथम कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात.
• जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने लाल तांबडी होऊन त्यांच्या कडा मुरगळतात, परिणामी झाडांची वाढ खुंटते, झाडांना पात्या, फुले आणि बोंडे कमी प्रमाणात लागतात.
1) मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रीड ७० डब्ल्यू. एस १० ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
2) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रीस आणि चिकट तेलाने लेपित पिवळे (फुलकिडे साठी निळे रंगाचे ) चिकट सापळे वापरा.
3) नंतरच्या काळात सर्वेक्षणांती कपाशीच्या एका पानावर सरासरी १० मावा किंवा २- ३ तुडतुडे किंवा १० फुलकिडे किंवा एकत्रीत १० रस शोषक किडी (मावा, तुडतुडे आणि फुलकिडे) आढळून आल्यास व्यवस्थापनाकरीता पुढे दिलेल्या कोणत्याही एका लेबल क्लेम किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी.
अॅसिटामीप्रीड २०% एसपी १ ग्रम /बुप्रोफेझीन २५% ईसी १६ मिली / क्लोथीअनिडीन ५०% डब्ल्यूडीजी ०.६-०.८ ग्रम / डीनोटेफुरान २०% एसजी २.५ ग्राम / फिप्रोनील ५% एससी ३० मिली /इमिडाक्लोप्रीड १७.८% एसएल २ मिली/ फ्लोनीकामाईड ५०% डब्ल्युजी ३ ग्राम ( प्रती १० लिटर पाण्यात)
२) मावा • मावा रंगाने पिवळसर किंवा फिक्कट हिरवा असतो.
• मावा कोवळ्या डहाळीवर किंवा पानाच्या खालच्या बाजूने समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. तसेच आपल्या शरीरातून चिकट द्रव बाहेर टाकतात आणि त्यावर काळी बुरशी वाढते.
• त्यामुळे पानांव्दारे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा उत्पन्न होते.
• मावा किडींचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास पाने कोकडतात आणि झाडांची वाढ खुंटते
३) फुलकिडे • फुलकिडे रंगाने फिक्कट पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे असून आकाराने लहान व लांबट असतात.
• प्रौढ व पिल्ले कपाशीची पाने आणि हिरवी बोंडे खरडून त्यातून निघणारा रस शोषण करतात.
• त्यामुळे पानावर प्रथम पांढुरके चट्टे व नंतर तपकिरी ठिपके दिसून येतात.
४) पांढरी माशी • पांढरी माशी आकाराने अगदी लहान असून पंख पांढुरके किंवा करड्या रंगाचे असतात.
• शरीरावर पिवळसर झाक असून डोक्यावर मध्यभागी दोन तांबडे ठिपके असतात.
• पांढऱ्या माशीची पिल्ले पानाच्या मागच्या बाजुने एका ठिकाणी स्थिर राहून पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पाने कोमेजतात.
• तीव्र स्वरूपाचा प्रादुर्भाव असल्यास पाने लालसर ठिसूळ होऊन वाळतात. याशिवाय पिल्ले शरीरातून चिकट द्रव बाहेर टाकतात, त्यावर काळी बुरशी वाढते. असे प्रादुर्भावग्रस्त झाड चिकट व काळसर होते.
• झाडाची वाढ खुंटते आणि त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
कापूस पिकावर सर्वेक्षणांती सरासरी ८ ते १० प्रौढमाशा किंवा २० पिल्ले प्रति पान आढळून आल्यास व्यवस्थापनाकरीता पुढे दिलेल्या कोणत्याही एका लेबल क्लेम किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी. अॅसिटामीप्रीड २०% एसपी १ ग्रम /बुप्रोफेझीन २५% ईसी १६ मिली / क्लोथीअनिडीन ५०% डब्ल्यूडीजी ०.६-०.८ ग्रम / डीनोटेफुरान २०% एसजी २.५ ग्राम / फिप्रोनील ५% एससी ३० मिली /इमिडाक्लोप्रीड १७.८% एसएल २ मिली/ फ्लोनीकअमाईड ५०% डब्ल्युजी ३ ग्राम ( प्रती १० लिटर पाण्यात)
५) पिठ्या ढेकूण (मिली बग) • या किडींचे प्रौढ, मादी व पीले शरीराने मृदु, अंडाकृती चापट असतात.
• नुकत्याच अंड्यातून निघालेल्या पिल्लांच्या अंगावर कापसासारखे मऊ आवरण नसते व जशी जशी त्यांची वाढ होत जाते हे आवरण दाट होत जाते व संपूर्ण शरीर कापसासारखे किंवा पिठासारखे मऊ मेणकर पदाथनि झाकलेले असते त्यामुळेच त्याला पिठ्या ढेकूण असे संबोधल्या जाते.
• या किडीचे प्रौढ व पील्लं पाने, पात्या, बोंडे, कोवळी फांदी तसेच कोवळ्या शेंड्यामधुन रस शोषण करतात त्यामुळे पाने चुरगळतात, शेंड्यांना झुपक्याचा आकार येतो, जास्त प्रादुर्भाव असल्यास संपूर्ण झाड वाळते.
• तसेच ही कीड आपल्या शरीराव्दारे साखरेच्या पाकासारखा गोड व चिकट पदार्थ बाहेर टाकते. तो झाडावर पसरतो, त्यावर काळी बुरशी वाढते व संपुर्ण झाड चिकट व काळसर दिसते. परिणामी पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा उत्पत्र होते. झाडाची वाढ खुंटते, बोंडे अपरिपक्व अवस्थेत उमलतात त्यामुळे कापसाची प्रत खालावते व उत्पादनात घट येते.
• कपाशीशिवाय ही कीड पेटारी, आघाडा, केना, दुधी, गाजरगवत, घाणेरी, वांगे, टमाटर, भेंडी, जास्वंद, कुंदा, शेवंती, शोभिवंत झाडे तथा फळझाडे पेरु, सिताफळ इत्यादींवर सुध्दा आढळून येते. या किडीचा प्रसार हवा, प्रादुर्भावग्रस्त पिकामध्ये ने आण, पाटाचे पाणी, जनावरे, पक्षी इ.द्वारे होतो.
१) कपाशी पिकाचा खोडवा घेण्याचे टाळावे.
२) दरवर्षी पिकाची फेरपालट करावी.
३) कपाशीचे पिक दाटणार नाही यांची काळजी घ्यावी.
४) शिफारशी पेक्षा जास्त नत्र खताचा वापर टाळावा.
५) बांधावरील तसेच शेताच्या सभोवताल पर्यायी खाद्य वनस्पतीवरील पिठ्या ढेकूण किडीचा वेळीच बंदोबस्त करावा.
६) वेळोवेळी आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे.
७) या किडीचे नैसर्गिक शत्रु किटक (परभक्षक) जसे लेडी बिटल, क्रायसोपा, क्रीप्टोलेमस तसेच ब्रुमस स‌लॅरीस भुंगा व परोपजीवी कीटक अॅनॅशीयस प्रजाती इ. ची पूरेशी संख्या आढळून आल्यास, रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.
बोंडअळ्या
१) ठिपक्याची बोंडअळी अळीचा रंग करडा असून डोके गर्द रंगाचे असते. अंगावर बरेच काळे व बदामी ठिपके असतात. कपाशीला पात्या येण्याचे अगोदर ही अळी प्रथम कोवळ्या शेंड्यांना छिद्र पाडून पोखरून खाते. त्यामुळे असे शेंडे सुकून नंतर वाळतात. पात्या आल्यावर अळी पात्या, कळ्या, फुले आणि बोंडांना नुकसान पोहचविते. यामुळे त्यांची गळ होते.
२) हिरवी बोंडअळी अळी रंगाने हिरवट असून तिच्या कडेला तुटक गर्द करड्या रेषा असतात. लहान अळ्या पात्या व कळ्यांना नुकसान पोहचवितात. मोठ्या अळ्या बोंडांना छिद्र पाडून आतील भाग खाऊन पोकळ करतात. या अळीने केलेली छिद्रे अनियमित गोल व तुलनात्मकदृष्टया मोठी असतात. बरेचदा अळीचा अर्धा भाग बोंडाच्या बाहेर असतो. प्रादूर्भावग्रस्त पात्या व लहान बोंडे गळून पडतात. प्रादूर्भावग्रस्त मोठी बोंडे जी झाडावर राहतात ती पावसाच्या पाण्यामुळे सडतात व त्यातील रूईची प्रत खालावते.
व्यवस्थापन १. पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसानी बोंडअळ्यांची अंडी शेतात दिसू लागताच ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकाची अंडी हेक्टरी १ ते १.५ लाख याप्रमाणात दर आठवड्याने तीन ते सहा वेळा कपाशीच्या शेतात लावावीत. यावेळी किटकनाशकाची फवारणी करू नये.
२. कपाशीच्या पिकावर फक्त हिरव्या बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, हिरव्या बोंडअळीचा विषाणू (एच.ए.एन.पी.व्ही.) २५० एल.ई. प्रति हेक्टरी याप्रमाणे एक हेक्टर क्षेत्राला लागणाऱ्या पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी. या फवारणीचे द्रावणात राणीपाल १ ग्रॅम प्रति १० लिटर याप्रमाणे मिसळावे.
३. निंबोळी अर्क ५ टक्के किंवा निंबोळी अर्क ५ टक्के अधिक शिफारस केलेल्या कोणत्याही एका किटकनाशकाची अर्धी मात्रा मिसळून बोंडअळ्यांचे नियंत्रणासाठी फवारणी करावी.
४. कपाशीवरील अमेरिकन आणि ठिपक्याच्या बोंडअळीचे व्यवस्थापनासाठी स्पीनोसॅड ४५ एस.सी. २.२२ मि.ली. प्रती १० लिटर पाणी आणि गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनासाठी बिटा सायफ्ल्यूथ्रीन २.५ टक्के प्रवाही ०.००२५ टक्केच्या १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५. सर्वेक्षणांती बोंडअळ्यांनी पात्या, फुले आणि बोंडांवर ५ टक्के नुकसानीची मर्यादा गाठल्याचे आढळून आल्यास पुढे दिलेल्या लेबल क्लेम तक्त्यामधील किटकनाशकापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) गुलाबी बोंडअळी अंड्यातून निघालेली अळी रंगाने पांढुरकी तर पूर्ण वाढलेली अळी गुलाबी रंगाची असते. अळी फुले व हिरव्या बोंडांना नुकसान पोहचविते. ज्या फुलांमध्ये ही अळी असते, अशी फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. यालाच 'डोमकळी' म्हणतात. या अळीचा प्रादुर्भाव बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर हे छिद्र बंद होते. त्यामुळे बोंडाचे वरून निरीक्षण केल्यानंतर सुध्दा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही. अळी अवस्था बोंडामध्ये पूर्ण झाल्यानंतरच ही अळी कोषावस्थेत जाण्यासाठी बोंडाला छिद्र करून बाहेर पडते. अशी प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्क न होताच फुटतात. त्यामुळे कापसाची प्रत बिघडते. गुलाबी बोंडअळी बोंडात राहून सरकीचेही नुकसान करते. त्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती आणि तेलाच्या प्रमाणात घट होते.
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन (IPM) १. पिकाचा हंगाम डिसेंबर पर्यंत संपवून किडग्रस्त बोंडासहीत पऱ्हाट्याची सेंद्रिय खतासाठी विल्हेवाट लावावी.
२. कापूस संकलन केंद्रे व जिनिंग फॅक्टरीमधये १५ ते २० कामगंध सापळे (डिसेंबर ते जुलैपर्यंत) लावून पतंगाचा मोठ्या प्रमाणावर नायनाट करावा.
३. हंगाम संपल्या बरोबर लगेच खोल नांगरणी करावी म्हणजे पतंगाचे जमिनीतील कोष उन्हाने किंवा पक्षाचे पक्ष होवून नष्ट होतील.
४. पूर्व मान्सुन पेरणी शक्यतो टाळून हंगामात वेळेवर (जुन ते जुलैचा १ ला आठवडा) पेरणी करावी.
५. पानावर लव असलेल्या लवकर / मध्यम कालावधीच्या बीटी कपाशीचे वाणाची निवड करून त्यासोबत बिगर बिटी (रेफ्युजी) चा वापर करावा.
६. कोरडवाहू बीटी कपाशीची पेरणी चौफुलीवर करावी (३ x १.५ फुट किंवा जमिनीच्या मगदा‌नुसार योग्य अंतर निवडावे)
७. नत्र खताचा संतुलीत वापर करावा.
८. कपाशीला पात्या लागण्यास सुरूवात झाल्यानंतर पिकामध्ये एकरी २ फेरोमोन सापळे या प्रमाणे लावावे, वेष्टणावरील सुचनेनुसार विशिष्ट कालावधीत वड्या (ल्युर) बदलाव्या व दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करावे.
९. कपाशीला पात्या आल्यानंतर ७ ते ८ वेळा पिकामध्ये दर १० दिवसानंतर ट्रायकोग्रामा बँक्ट्री या परोपजीवी मित्रकिटक असलेले ट्रायकोकार्ड एकरी ३ कार्ड याप्रमाणे लावावे म्हणजे बोंड अळ्यांचा अंडी अवस्थेत नायनाट होईल.
१०. फुलाच्या अवस्थेत दर आठवड्याने डोमकळ्या (गुलाबी बोंड अळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या.
११. फुले व प्रामुख्याने बोंड धरण्याचे अवस्थेत ५ टक्के निंबोळी अर्क किंवा शिफारशीत निम किटकनाशके (अझाडिरेक्टीन) किंवा जैविक बुरशीनाशक (पुरेशी आर्द्रता असतांना) बिव्हेरीया बॅसीयाना १.१५ टक्के डब्ल्युपी ५० ग्रॅ/१० लिटर पाणी याप्रमाणे एक फवारणी करावी.
सर्वेक्षण पात्या व फुले अवस्थेत किमान दर आठवड्याने शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडून त्यावरील एकुण व प्रादुर्भावग्रस्त फुले (डोमकळ्या) / पात्या/बोंडे मोजून ५ ते १० टक्के प्रादुर्भावाचे प्रमाण आढळल्यास तसेच प्राधान्याने बोंडावस्थेत २० हिरवी बोंडे तोडून (प्रत्येक झाडावरील एक याप्रमाणे) त्यात ५ ते १० टक्के । प्रादुर्भावग्रस्त बोंडे किंवा २० पैकी २ बोंडात गुलाबी / पांढऱ्या अळया असल्यास आर्थिक नुकसान संकेतपातळी समजून रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.
१३. मोनोक्रोटोफॉस, ट्रायझोफॉस सारखे बहुआयामी तसेच खुप विषारी किटकनाशके कपाशीच्या सुरूवातीच्या अवस्थेत (पहिले ६० दिवसात) वापर करू नये त्यामुळे नैसर्गिक शत्रु किटक मारल्या जाऊन किडींचा उद्रेक होण्याची शक्यता असते.
रासायनिक किटकनाशके गुलाबी बोंडअळी आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. त्यामधये क्विनॉलफॉस २५ टक्के ए एफ २५ मि.ली. किंवा क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मि.ली. किंवा फेनप्रोपॅथ्रीन १०/३० टक्के प्रवाही ७.५ ते १०/२.५ ते ३.४ मि.ली. किंवा सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही ७.६ मि.ली. किंवा क्लोरॅट्रॅलीनीप्रोल ९.३ टक्के लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४.६ टक्के झेड सी ५ मि.ली. किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के सायपरमेथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मि.ली. (किटकनाशकांचे प्रमाण १० लिटर पाण्यासाठी) टीप : पायरेथ्राईड वर्गातील किटकनाशके खबरदारी म्हणून त्यांचा कपाशीचे पीक ७० ते ७५ दिवसांचे झाल्यानंतरच एक किंवा दोन वेळा वापर करावा. पायरेथ्राईडच्या अधिक वापरामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
कपाशीवरील पीक संरक्षण खर्चात बचत तसेच किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी खालील बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
१. किटकनाशकाचा वापर गरजेनुसार म्हणजेच किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतरच करावा,
२. प्रत्येक फवारणीचे वेळी एकच एक किटकनाशक न वापरता आलटून पालटून वापरावे.
३. कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडी, बोंडअळ्या आणि पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी दिलेल्या किटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पॉवर स्प्रेअर वापरायचा असल्यास पाण्याचे प्रमाण कायम ठेवून किटकनाशकाचे प्रमाण तीनपट करावे.
कोरडवाहू कपाशीवरील किडींचे परिणामकारक, प्रभावी आणि किफायतशीर व्यवस्थापनासाठी खालील सुधारित एकीकृत कीड व्यवस्थापन संचाचा अवलंब करण्याची शिफारस विद्यापीठाद्वारे २००३-०४ या वर्षी करण्यात आलेली आहे.
१) थायोमेथोक्झाम ७० डब्ल्यू.एस. ४.२८ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया.
२) रस शोषक किडींकरिता आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आधारित अॅसिटामिप्रीड २० एस.पी. १५ ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात एक फवारणी.
३) उगवणीनंतर ४५ ते ५० आणि ५५ ते ६० दिवसानी अशी दोन वेळा ट्रायकोग्रामा चिलोनीसची अंडी हेक्टरी दीड लाख या प्रमाणात कपाशीचे शेतात सोडणे.
४) बोंडअळ्यांसाठी आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आधारित अनुक्रमे निमार्क ३०० पीपीएम ५० मि.ली., स्पीनोसॅड ४५ एस.सी. २.२२ मि.ली. आणि बिटा-सायफ्ल्यूथ्रीन २.५ टक्के प्रवाही १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार सलग एकेक फवारणी.
कोरडवाहू बीटी कपाशीवरील एकात्मिक कीड व्यवस्थापनाची खालीलप्रमाणे शिफारस करण्यात येत आहे.
१) स्वच्छता मोहिम आणि मार्च / एप्रिल महिन्यात जमिनीची खोल नांगरणी.
२) कपाशीच्या सभोवती मका, चवळी, झेंडू व एरंडी या मिश्र सापळा पिकाची एक ओळ.
३) पिक उगवल्यानंतर १०५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी.
४) पिक उगवल्यानंतर ११५ दिवसांनी ट्रायकोग्रॅमाटॉयडीया बॅक्ट्रीया परोपजीवी किटकाचे १.५ लक्ष अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात प्रसार करावा.
५) पिक उगवल्यानंतर १२५ दिवसांनी हेक्टरी १०-१२ पिवळी चिकट सापळ्याचा वापर.
६) पिक उगवल्यानंतर १४० दिवसांनी थायोडिकार्ब ७५ टक्के १ किलो ५०० लि. पाणी याप्रमाणात फवारणी.
७) अळ्या व किडग्रस्त भागाचा नायनाट.
८) किडींनी आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यानंतर शिफारशीप्रमाणे रासायनिक किटकनाशकांचा वापर.
कपाशीवरील रोग व त्यांचे व्यवस्थापन
रोग लक्षणे नियंत्रण/उपाय
अणुजीवी करपा • हा रोग लॅन्थोमोनास ऑक्झॉनोपोडीस पॅथोव्होर मालवासियारम या अणुजीवामुळे होतो.
• रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाणे अथवा रोगग्रस्त जमिनीतून होतो. रोगामुळे पानावर प्रथम कोनात्मक,. तेलकट स्वरूपाचे व नंतर काळसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
• पानाच्या शिरा व झाडाच्या फांद्या काळ्या पडतात. कालांतराने पाने गळून पडतात. बोंडावर तेलकट, काळपट डाग पडतात.
• बोंडे उमलत नाहीत. बोंडातील कापूस पिवळा पडून त्याची प्रत खालावते
१) नियंत्रणाकरिता कारबोक्झिन (व्हिटॅव्हॅक्स) १ ग्रॅम अधिक थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.
२) दुय्यम संसर्ग टाळण्यासाठी १ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड अधिक १० लिटर पाणी याप्रमाणात घेऊन फवारणी करावी.
३) रोगाचे प्रमाण व तिव्रता आटोक्यात न आल्यास १० ते १२ दिवसाचे अंतराने पुन्हा फवारणी करावी.
४) बागायती पिकावर रोगाचे प्रमाण व तिव्रता जास्त आढळून येत असल्यामुळे चार फवारण्या करणे आवश्यक ठरते किंवा रोग आढळल्यानंतर १० दिवसाचे अंतराने ५ टक्के निंबोळी अर्काच्या तीन फवारण्या केल्यास ते अणुजीवी करपा रोगाचे नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन + कॉपर ऑक्सीक्लोराईडयुक्त बुरशीनाशकाइतकेच प्रभावी ठरते किंवा सुडोमोनास फ्ल्युरोसन्स पी.एफ.-१, १० ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रियेसोबत २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात तीन फवारण्या उगवणीनंतर ३०,६० आणि ९० व्या दिवशी कराव्या.
पानावरील डाग / चट्टे • या रोगास मायरोथेशियम रोरीडम, अॅल्टरनेरिया मॅक्रोस्पोरा व सरकोस्पोरा इत्यादी बुरशी कारणीभूत असतात.
• रोगामुळे पानावर गोल, पांढरे, रंगीत कडा असणारे, तपकिरी काळपट रंगाचे अनियमित स्वरूपाचे ठिपके पडणे व पानामधला भाग गळून पडणे इत्यादी लक्षणे दिसतात.
१) प्रतिबंधक उपाय म्हणून वर सांगितल्याप्रमाणे बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करावी.
२) रोगग्रस्त पिकावर मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची २५ ग्रॅम, १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
दहिया • हा रोग रॅम्युलेरिया गॉसीपॉय या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रसार बुरशीची रेणूफळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हवेव्दारे प्रसारित होऊन होतो.
• पानावर दही शिंपडल्यासारखे पांढरे ठिपके पडतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने, पात्या, फुले व अपरिपक्क बोंडे गळून पडतात.
१) रोग नियंत्रणासाठी उपलब्धतेनुसार ३०० मेश गंधकाच्या भुकटीची हेक्टरी २०-२५ किलो या प्रमाणात पुरळणी करावी किंवा
२) पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम, १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सकाळी किंवा दुपारनंतर फवारणी करावी किंवा
३) कार्बेन्डॉझिम १० ग्रॅम १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी द्यावी.
• उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू देणे.
• रोगग्रस्त अवशेषांचा नायनाट करणे.
• तंतूविरहित केलेल्या बियाण्याचा पेरणीसाठी उपयोग करणे.
• नत्रयुक्त खतांचा अवास्तव वापर थांबविणे.
• पिकांची फेरपालट करणे.
• मिश्र/आंतरपिके घेणे इ. बाबी कापूस रोग व्यवस्थापनात महत्वाच्या व फायदेशीर ठरतात.
आकस्मिक मर हा रोग नसून, या रोगाचा कोणत्याही बुरशी, जीवाणु किंवा विषाणु जबाबदार नाही. दीर्घ पावसाचा खंड नंतर भरपूर पाऊस आणि जमिनीत अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे या रोगाची लक्षणे दिसतात. त्यामुळे | झाडावरील संपूर्ण पाने मलुल होऊन खालच्या दिशेने वाकतात व झाड मेल्यागत वाटते. या रोगाची लक्षणे पीक फुल व बोंड या स्थितीत असतांना दिसतात आणि संपूर्ण क्षेत्रात काहीच झाड तशी दिसतात. याच्या व्यवस्थापनाकरीता कॉपर ऑक्झीक्लोराइड २५ टक्के + युरिया १५० ग्रॅ. या प्रमाणे प्रादुर्भावग्रस्त झाडालगत साधारण १०० मि.ली. द्रावण पडेल याप्रमाणे बांगडी पध्दतीने देऊन झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे.
कपाशीतील बोंडसड
बोंड सडण्याचे कारण कपाशीची पात्याफुले आणि बोंडे विकसीत होण्याच्या अवस्थेत सततच्या ढगाळ वातावरण, सतत पडणारा पाऊस आणि हवामानातील अधिक आर्द्रता असे अशा पोषक हवामानात रोगकारक बुरशी, जीवाणु, रस शोषणारे किटक (फुलकिडे व तुडतुडे) व हिरव्या/करड्या/लाल रंगाचे ढेकूण घटक बोंड सडण्याला पोषक असतात.
बोंड सडण्याचे प्रकार व लक्षणे
बाह्य बोंडसड या प्रकारात मुख्यतः मृतजीवी, काही रोगकारक बुरशी व काही प्रमाणात बोंडावरील करपा रोगाला कारणीभूत जिवाणू यांचा समावेश असतो. बोंडे उमलण्याच्या प्राथमिक अवस्थेत असे प्रकार साधारणतः आढळून येतात. बहुतेक वेळा बोंडावर बुरशीची वाढ झाल्याचे आढळते.
आंतरीक बोंडसड बोंडावरील पाकळ्या चिकटून राहिल्याने बोंडाच्या पृष्ठभागावर ओलसरपणा राहतो. अशा ठिकाणी जीवाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते. कळ्यांवर व बोंडावरील रसशोषणारे ढेकूण यांचा प्रादुर्भाव या घटकांमुळे आंतरीक बॉड सडण्याची समस्या दिसून येते. बोंडाच्या बाह्य भागावर बुरशीची वाढ साधारणतः आढळून येत नाही. अशी बोंडे फोडून पाहिली असता जीवाणूंच्या प्रादुर्भावाने आतील रूई पिवळसर ते गुलाबी तपकिरी रंगाची किंवा डागाळलेली दिसून येते.
उपाययोजना * नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा.
* चांगल्या व्यवस्थापन पध्दतीव्दारे कापूस पिकाची अतिवाढ रोखावी.
* शेतातून पाण्याचा योग्य निचरा होण्याची सोय करावी.
* पिकाची लागवड शिफारस केलेल्या अंतरावर करावी.
* पात्या, फुले आणि बोंडे विकसीत होण्याच्या अवस्थेत रस शोषणारे किटक (फुलकिडे व तुडतुडे) व हिरव्या, करड्या तसेच लाल रंगाचे ढेकूण या किडीच्या नियंत्रणासाठी वेळेत योग्य उपाययोजना कराव्यात.
बॉडसड नियंत्रणाचे रासायनिक उपाय ( खालीलपैकी कोणतेही एक बुरशीनाशकाची फवारणी करावी.)
बुरशीनाशकाचे नाव मात्रा/१० लिटर पाणी
आंतरीक बोंडसड
कॉपर ऑक्सीक्लोराईड (५०% डब्ल्यूपी)+ स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट २५ ग्रॅम + १ग्रॅम
बाह्य बोंडसड
प्रोपीकोनाझोल (२५ ईसी) किंवा १० मि.ली.
पायराक्लोस्रोबीन (२०% डब्ल्यु.जी.) किंवा प्रोपीकोनाझोल (२५ ईसी) किंवा
मेटीराम (५५%) + पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्ल्यु.जी.) किंवा २० ग्रॅम
अॅझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२% डब्ल्यु/डब्ल्यू) + डायफेनोकोनॅझोल (११.४% एस.सी.) किंवा १० मि.ली.
प्रोपीनेब (७०% डब्ल्यु.पी.) २५ ते ३० ग्रॅम