S
H
A
S
H
V
A
T
Whats-app.png

Blog

कापूस लागवड तंत्रज्ञान

cotton_logo.jpeg
कापूस लागवड

कपाशी हे विदर्भातील एकमेव नगदी पीक असून या पिकाखाली सुमारे १५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. परंतु सरासरी उत्पादकता ३०० किलो रुई / हेक्टर ही भारताच्या सरासरी पेक्षा (५३७ किलो रुई / हेक्टर) तुलनात्मकरित्या कमी आहे. अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. कापूस उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत.

READ MORE

धान लागवड तंत्रज्ञान

धान लागवड

आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे.

READ MORE

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान

Picture3.png
सोयाबीन लागवड तंत्रज्ञान

सोयाबीन या पिकास जगामध्ये अद्भूत कडधान्य (वंडरबीन्स) असे संबोधले जाते. गुण संपन्नतेने नटलेले असे हे द्विदल पिक म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल देणगीच होय. सोयाबिन हे खरीप हंगामातील तेलबिया तसेच कडधान्याचे महत्वाचे पिक आहे. कृषी क्षेत्रातील आर्थिक स्थिती तसेच खाद्यतेलाच्या बाबतीत अर्थव्यवस्था सुधारण्याची क्षमता या पिकात आहे. सोयाबीन हे विदर्भातील सर्वात महत्वाचे तेलवर्गीय पीक असून या पिकाखाली सुमारे १७ ते १८ लाख हेक्टर क्षेत्र असते.

READ MORE

मिरची लागवड तंत्रज्ञान

picture4.jpg
मिरची लागवड तंत्रज्ञान

मिरची हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील असल्याचे नोंदवले जाते आणि भारतासह सर्व उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वितरीत केले जाते. 15 व्या शतकाच्या शेवटी पोर्तुगीजांनी ते भारतात प्रथम आणले. आता हे थंड भाग वगळता जगभर घेतले जाते.

READ MORE

तूर पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान

picture4.jpg
तूर पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान

जगात कडधान्याचे सर्वात जास्त उत्पादन, वापर आणि आयात भारतातच होते. कडधान्यामध्ये तूर हे पिक सर्वात महत्वाचे असुन भारतीयांच्या आहारात तूरडाळीस फार महत्व आहे. या पिकाच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबियम जिवाणु हवेतील नत्र शोषुन घेते त्यामुळे या पिकाची नत्राची गरज ब-याचशा प्रमाणात परस्पर भागविली जातेळता जगभर घेतले जाते.

READ MORE