धान लागवड तंत्रज्ञान
| भात हे उष्ण कटीबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान २४ ते ३२ अंश से. ग्रे. पोषक असते. चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता ६५ टक्के लागते. या पिकास सरासरी १००० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. |
| पोयटा व चिकणमातीयुक्त पोयता त्याचप्रमाणे जमिनीचा सामू (पी. एच.) ५ ते ८ या दरम्यान असल्यास पिकापासून अधिक उत्पादन मिळते. |
| प्रती हेक्टरी लागणारे बियाणे हे दाण्याची प्रत आणि लावणीच्या वेळी एक चौ. मी. मधील चुडांच्या संख्येवर अवलंबून आहे. प्रती हेक्टर क्षेत्राला लागणारे बियाणे पुढीलप्रमाणे- | |
| दाण्याची प्रत | प्रती हेक्टरी बियाणे (किलो) |
| बारीक दाणा (झिनिया, कोलन गट) | २५.५ |
| मध्यम दाणा (रत्ना गट) | २५ ते ३० |
| जाड दाणा (जया गट) | ३० ते ४० |
| पोयटा व चिकणमातीयुक्त पोयता त्याचप्रमाणे जमिनीचा सामू (पी. एच.) ५ ते ८ या दरम्यान असल्यास पिकापासून अधिक उत्पादन मिळते. |
| हंगाम अखेर कापणी झाल्यावर जमीन नांगरून शेतातील सर्व धसकटे, गवत, झुडुपे कापून जाळून टाकावीत. पूर्व मशागतीनंतर हेक्टरी २५ ते ३० गाड्या (१० टन) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावे. पावसाळा सुरू झाल्यावर शेतात पाणी साचले असताना उभी व आडवी नांगरणी करावी. पेंचा / बोरू सारखे हिरवळीचे पीक घेऊन चिखलणीच्या वेळी जमिनीत गाढावे. गिरीपुष्याची पाने जमिनीत गाढावीत |
|
| रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी जमीन, नांगरून, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. नंतर १२० से.मी. रुंद (४ फुट) व ८ ते १० से. मी. (८ ते १० बोटे) ऊंच आणि शेताचा आकार व उतारानुसार लांबी ठेवून गादी वाफे तयार करावेत. चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली तसेच ज्या ठिकाणी हंगामामध्ये सुरुवातीस पाऊस कमी असतो अशा ठिकाणी गादी वाफ्याची उंची ३ ते ५ से. मी. ठेवली तरी चालते. गादी वाफे करणे शक्य नसेल तर रोप तयार करण्यासाठी शेतातील उंचवट्याची जागा निवडावी व चारही बाजूंनी खोल चारी काढावी. यामुळे पाऊस जास्त झाला तरी पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल व कोवळी रोपे मरण्याचे प्रमाण कमी राहील. |
| पेरणी |
| जमीन नांगरून, ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी आणि १०० सें.मी. रुंद व १० सें.मी. उंच असे घोम लांबीचे गादीवाफे तयार करावे. या गादीवाफ्यावर दर आर क्षेत्राला ३०० किलो चांगले कुजलेले शेणखत, १ किलो युरिय अधिक ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीव टाकून मिसळावे, पेरणीसाठी बारीक जातीकरिता ३५ ते ४० किलो आणि मध्यम व ठोकळ जातीकरिता ५० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. सह्याद्री या संकरित वाणाचे हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रियेसाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ (३ टक्के) या प्रमाणात द्रावण करून त्यात बी ओतावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बी चाळणीने काढून जाळून टाकावे. तळातील निरोगी बी २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत २४ तास वाळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम (३ ग्रॅम/किलो) बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. |
| चिखलणी |
| पूर्वमशागत केलेल्या धानाच्या शेतात लाकडी नांगर, पॉवर टिलर अथवा ट्रॅक्टरने चिखलणी करावी. चिखलणीनंतर शेत समपातळीत येण्यासाठी पाटी (फळी) फिरवावी. चिखलणी करतांना स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खताची शिफारस केलेली पूर्ण मात्रा (५० कि. स्फुरद ५० कि. पालाश प्रति हे.) व नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा (५० कि. नत्र प्रति हे.) शेतात मिसळावी. शेतात पाणी बांधून ठेवावे. |
| रोवणी |
| रोपांचे वय २१ ते २५ दिवसांचे झाल्यावर रोवणी करावी. त्यासाठी रोपे काढण्याच्या दोन दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढवावी. त्यामुळे मुळे न तुटता रोप काढण्यास मदत होते. रोपांची लावणी २० सें.मी. x १५ सें.मी. अंतरावर प्रत्येक चुडात २ ते ३ रोपे सरळ व उथळ म्हणजेच २ ते ४ सें.मी. खोलवर लावावीत. सह्याद्री या संकरित धानाची रोवणी २० x २० सें.मी. अंतरावर करावी व प्रत्येक चुडात एक रोप लावावे. |
| जमिनीची तपासणी करून योग्य प्रमाणात रासायनिक खताचा वापर केल्यास शेती किफायतशीर होते. सर्वसाधारणपणे १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि नत्राची अर्धी मात्रा चिखलणीच्या वेळेस तर उरलेली नत्राची अर्धी मात्रा दोन समान हप्त्यात (फुटवे फुटण्याच्या वेळी आणि लोंबी येण्याच्या सुरूवातीस) विभागून द्यावी. कोरडवाहू धानाकरिता ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. सह्याद्री या संकरित वाणास रासायनिक खताची शिफारसीत मात्रा २५ टक्क्यांने वाढवून द्यावी. |
| धान लावणीनंतर रोपांची मुळे चांगली रूजेपर्यंत बांधीत पाण्याची पातळी २.५ सें.मी. (एक इंच) ठेवावी. यानंतर दाणा पक्व होईपर्यंत ही पातळी साधारणतः ५ सें.मी. (दोन इंच) पर्यंत वाढवावी. अधूनमधून पाण्याचा निचरा करावा. पीक निसवण्यापूर्वी १० दिवस व पीक निसवल्यानंतर १० दिवस पाण्याची पातळी १० सें.मी. (चार इंच) ठेवावी., त्यानंतर हळूहळू पाण्याची पातळी कमी करावी व कापणीपूर्वी १० दिवस अगोदर बांधीतील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. पीक फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. |
| आंतरमशागतीची कामे पीक निसवण्यापूर्वी एक महिन्याअगोदर संपवावी. तणांच्या नियंत्रणासाठी धान रोवणीनंतर ५-६ दिवसांनी ४ लिटर बुटाक्लोर + ५०० लिटर पाणी प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावे किंवा लावणीनंतर सुमारे १५ दिवसांनी कोळपणी व निंदणी करून त्यानंतर २-३ आठवड्यांनी पुन्हा एक कोळपणी व निंदणी करून पीक तणविरहीत ठेवावे. |
|
| कीटक | लक्षणे | नियंत्रण/उपाय |
| पिवळा खोडकिडा (स्किरपोफॅगा इन्सरटयुलस) | • मादी पतंग पिवळसर-नारिंगी रंगाचा असून त्याच्या पुढील पंखावर एक काळा ठिपका असतो. • प्रादुर्भाव रोपवाटीकेपासूनच दिसून येतो • फुटव्यांच्या अवस्थेत प्रादुर्भीत फुटव्यांचा कोंब (गाभा) सुकतो यालाच गाभामर म्हणतात. • पोटरीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास लोंब्या पांढरट पडुन वाळतात यालाच पळींज किंवा पांढरी पिशी म्हणतात. |
• पिक कापणी नंतर जमीन उभी-आडवी नांगरून धसकटे नष्ट करावीत • पतंग प्रकाशपिंज-यात आकर्षित करून नष्ट करावेत • कीडीचे अंडीपूंज, कीडग्रस्त फुटवे / पळींज उपटून अळीसह नष्ट करावेत • लिंगप्रलोभन (फेरॉमोन) सापळयांचा प्रति हेक्टर २० सापळे या प्रमाणात वापर करावा • जैविक नियंत्रण: लावणीनंतर ३० दिवसांपासून ट्रायकोग्रामा जापोनिकमची ५०,००० अंडी/हे ३ ते ४ वेळा १० दिवसांच्या अंतराने शेतात सोडावीत • पेरणीनंतर रोपवाटीकेमध्ये १५ दिवसांनी दाणेदार १० टक्के फोरेट १० कि. किंवा ३ टक्के कार्बोफ्युरॉन २५ कि. प्रति हेक्टरी टाकावे. • गरज असल्यास लागवडीनंतर क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २६ मि.ली. कारटॅप हायड्रोक्लोराईड ५० टक्के २० ग्रॅ. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि. ली. प्रती १० लि. पाण्यात मिसळून फवारावे. |
| पाने गुंडाळणारी अळी (नॅफलोक्रोसिस मेडीनॉलिस) | • पतंग सोनेरी फिकट पिवळसर रंगाचे असून पंखांवर काळी नागमोडी नक्षी असते. • अळी पानांच्या दोन्ही कडा एकत्र चिकटवून पानाची गुंडाळी करून त्यात राहते आणि आतील पृष्ठभागावरील हरितद्रव्य खरवडून खाते. • गुंडाळीच्या बाहय पृष्ठभागावर पांढरट चट्टा पडतो. |
• गुंडाळीग्रस्त पाने अळयांसह काढून नष्ट करावीत. • ट्रायकोग्रामा जापोनिकम किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीटकाची ५०,००० अंडी/हे. ३ ते ४ वेळा १० दिवसाच्या अंतराने पिकामध्ये सोडावीत • नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १२.५ मि.ली. अॅसिफेट ७५ टक्के २२.२ ग्रॅ., कारटॅप हायड्रोक्लोराईड ५० टक्के २०ग्रॅ. क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३७.५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी २० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. |
| गादमाशी | • अळी रोपाच्या खोडात शिरून त्यामध्ये वाढणारा कोवळा अंकुर कुरतडून खाते • तिच्या लाळेत “सिसिडोजन” नावाचे द्रव्य असते • सिसिडोजनमुळे अळीच्या भोवतालचा अंकुराचा भाग फुगतो व त्याची कांद्याच्या पातीसारखी पिवळसर पांढरट किंवा चंदेरी रंगाची नळी तयार होते. त्यालाच “नळ” किंवा “गाद” किंवा “पाँगा” असे म्हटले जाते आणि त्याला लोंबी येत नाही. |
• कीडग्रस्त रोपे किंवा चंदेरी पोंगे उपटून जाळावीत. • लागवडीनंतर २० दिवसांनी एक चंदेरी पोंगा प्रति चौ.मी. आढळल्यास ३ टक्के दाणेदार कार्बोफ्युरॉन २५ किलो किंवा क्लोरोपायरीफॉस १० टक्के १० कि. किंवा ०.३ टक्के दाणेदार फिप्रोनील २५ किलो प्रति हेक्टरी जमिनीत टाकावे. |
| तुडतुडे (हिरवे, पांढरे, तपकिरी) | • तुडतुडे ही कीड पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात न होणाऱ्या, घन लागवड केलेल्या आणि नत्र खताची मात्रा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिलेल्या शेतात प्रामुख्याने आढळून येते. त्याबरोबर, २८ ते ३० अंश सेल्सिअस तापमान, ८५ टक्केपेक्षा जास्त आर्द्रता आणि कमी पाऊस या किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक ठरतो. • तुडतुडे व त्यांची पिल्ले सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात. उपद्रव मोठ्या प्रमाणावर असेल तर रोपे वाळतात व जळल्यासारखी दिसतात. शेतात ठिकठिकाणी तुडतुड्यांमुळे करपून गेलेले गोलाकार भाताच्या पिकाचे खळे दिसतात यालाच “हॉपर बर्न” असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि आल्याच तर दाणे न भरता पोचट राहतात. |
• तुडतुडयांचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लावणी दाट करू नये. • दोन ओळीतील अंतर २० सें.मी. आणि दोन चुडातील अंतर १५ सें.मी. ठेवावे तसेच रोपांची पट्टा पध्दतीने लागण करावी. • नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात नत्र खताची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी. • शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा, पाणी बदलावे. • टेहळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. • प्रत्येक चुडात १० तुडतुडे या आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे किटकनाशकाची फवारणी करावी. यासाठी हेक्टरी ५०० लिटर पाण्यात इमिडाक्लोरोप्रीड १७.८ टक्के १२५ मि.ली. किंवा थायामिथॉक्झाम २५ टक्के डब्ल्युजी १०० ग्रॅम किंवा क्लोथियानिडीन ५० टक्के २५ ग्रॅम किंवा बुप्रोफेजीन २० टक्के + फिप्रोनील 3 टक्के एससी ५०० मि.ली. मिसळून फवारावे. किंवा इथोफेनप्राक्स १० टक्के ५०० मि.ली. किंवा फेनोबुकार्ब (बी.पी.एम.सी.) ५० टक्के ६०० मि.ली. या प्रमाणात फवारणी करावी. • पाण्यात इमिडाक्लोरोप्रीड १७.८ टक्के १२५ मि.ली. किंवा थायामिथॉक्झाम २५ टक्के डब्ल्युजी १०० ग्रॅम किंवा क्लोथियानिडीन ५० टक्के २५ ग्रॅम किंवा बुप्रोफेजीन २० टक्के + फिप्रोनील 3 टक्के एससी ५०० मि.ली. मिसळून फवारावे. किंवा इथोफेनप्राक्स १० टक्के ५०० मि.ली. किंवा फेनोबुकार्ब (बी.पी.एम.सी.) ५० टक्के ६०० मि.ली. या प्रमाणात फवारणी करावी. • फवारणी करताना कीटकनाशक फुटव्याच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. आठवडयानंतर परत प्रादुर्भाव आढळल्यास दोन ते तीन फवारण्या कराव्यात, कीटकनाशके बदलून वापरावीत. |
| रोग आणि त्यांचे नियंत्रण | ||
| लक्षणे व परिणाम | नियंत्रणाचे उपाय | |
| कडा करपा | • हा रोग जिवाणूजन्य असून हॉन्थोमोनास ओरायझी या जिवाणूमुळे उदभवतो • रोगग्रस्त रोपांची पाने कडेकडून मध्य शिरेच्या दिशेने करपतात • कालांतराने संपूर्ण पान करपते • सकाळी पानाच्या खालच्या बाजूला दुधाळ रंगाचे दवबिंदू साचलेले दिसतात • अनुकूल वातावरणात जिवाणुची संख्या वाढल्याने चुडातील रोपांची पाने करपून रोपे मरतात याला रोगाची मरअवस्था असे म्हणतात • प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात असताना अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत झाल्यास लोंबीतील बहुतांश दाणे भरत नाहीत. |
नत्र, स्फुरद, पालाश ही खते १०० ५० ५० प्रति हेक्टरी याप्रमाणात वापरावीत. नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन ५ ग्रॅम आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून एकत्रित फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांच्या अंतराने याच रासायनिक औषधांच्या आणखी दोन फवारण्या घ्याव्यात. |
| करपा | • हा बुरशीजन्य रोग असून मँग्नापोर्थी ग्रीसी या बुरशीमुळे होतो. • पानांवर शंखाकृती किंवा डोळयाच्या आकाराचे ठिपके आढळतात. • पानांवरील ठिपका मध्यभागी राखाडी रंगाचा आणि कडा तपकिरी असते. • असंख्य ठिपके एकत्र मिसळून पान करपते. • पीक वाढीच्या सर्व अवस्थांमधे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. • लोंबी भरण्याच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास लोंबीचा देठ काळा कुजलेल्या भागात लोंबी मोडते यालाच मानमोडी असे म्हटले जाते. |
• रोगग्रस्त बियाणे पेरणीसाठी वापरु नये • रोपवाटिकेत प्रति चौ. मी. क्षेत्रात १ किलो राख मिसळून बियाणे पेरावे. • नत्र खताबरोबरच स्फुरद आणि पालाश यांचा शिफारसीनुसार वापर करावा. • नियंत्रणासाठी खालील बुरशीनाशकाच्या तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने प्रती १० लि. पाणी याप्रमाणात कराव्यात. 1. ट्रायसाक्लॉझॉल ७५ टक्के डब्लू.पी. १० ग्रॅम 2. इडीफेनफॉस ५० टक्के प्रवाही १० मि.ली. 3. आयसोप्रोथिओलेन ४० टक्के प्रवाही १५ मि.ली. 4. कार्बेन्डॅझिम ५० टक्के डब्लू.पी. १० ग्र. |
| पर्णकोष करपा | • रोगाची लक्षणे लावणीनंतर फुटवे येणा-या अवस्थेत दिसून येतात • चुडाच्या तळाशी खोडावर तपकीरी रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके तयार होतात • बुरशी खोडाच्या आतील भागात प्रवेश करुन झपाटयाने वाढते • खोडाचा चिवटपणा कमी होवून खोडे कोलमडतात आणि पीक करपल्यासारखे दिसते • रोगग्रस्त झाडांवर लोंब्या धरत नाही. |
नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम ५० टक्के डब्लु.पी. २० ग्रॅ./ १० प्रक्रिया करावी.
नियंत्रणासाठी बुरशीनाशक डायफेनोकोनॅझॉल २५ टक्के इसी ५ मि.ली. किंवा हेक्साकोनॅझॉल ५ टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा प्रोपीकोनॅझॉल २५ टक्के प्रवाही १० मि.लि. प्रती १० ली. पाणी मिसळून फवारणी करावी. रोग तीव्रतेप्रमाणे दुसरी व तिसरी फवारणी २० दिवसांच्या अंतराने करावी. |


